Top five Stocks : शेअर बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, दिग्गज ब्रोकरेज फर्म 'मोतीलाल ओसवाल'ने या आठवड्यासाठी पाच आघाडीच्या कंपन्यांवर आपला सकारात्मक कल व्यक्त केला आहे. तंत्रज्ञान, ऊर्जा, लॉजिस्टिक आणि विमा क्षेत्रातील या कंपन्यांची तिसऱ्या तिमाहीतील कामगिरी आणि भविष्यातील विस्तार योजना लक्षात घेता, गुंतवणूकदारांना यामध्ये मोठी संधी दिसत आहे.
१. लेन्सकार्ट – लक्ष्य किंमत: ₹६००
लेन्सकार्टचे तंत्रज्ञान-आधारित मॉडेल आणि स्वतःचे उत्पादन यामुळे कंपनीने चष्म्याच्या बाजारपेठेत आपली पकड मजबूत केली आहे. भारतात अजूनही केवळ ३५% लोक चष्म्याचा वापर करतात, तर ५०% पेक्षा जास्त लोकांना याची गरज आहे. त्यामुळे बाजारपेठेत मोठी संधी आहे. २०२५-२८ दरम्यान कंपनीचा महसूल २५% वेगाने वाढण्याची शक्यता असून, स्टोअर्सच्या विस्तारामुळे नफ्यात मोठी वाढ अपेक्षित आहे.
२. सीमेन्स एनर्जी – लक्ष्य किंमत: ₹३६००
ऊर्जा संक्रमण आणि ट्रान्सफॉर्मरची वाढती मागणी यामुळे सीमेन्स एनर्जी सध्या सुस्थितीत आहे. तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीचा महसूल २६% नी वाढला असून नफ्यात ५७% ची मोठी झेप घेतली आहे. ट्रान्समिशन क्षेत्रातील वाढीमुळे २०२५ ते २०२८ दरम्यान कंपनीचा नफा ३२% चक्रवाढ दराने वाढण्याची अपेक्षा आहे.
३. डेल्हीवरी – लक्ष्य किंमत: ₹५८०
'ई-कॉम एक्सप्रेस'च्या संपादनानंतर डेल्हीवरीचे जाळे अधिक विस्तारले असून बाजारपेठेतील हिस्सा वाढला आहे. सऱ्या तिमाहीत कंपनीचा एबिटा मार्जिन ७.४% पर्यंत सुधारला आहे. डेल्हीवरी डायरेक्ट आणि रॅपिड यांसारख्या नवीन उपक्रमांमुळे २०२५-२८ दरम्यान एबिटा ४४% दराने वाढण्याची शक्यता आहे. कंपनी आता स्थिर नफ्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
४. एसबीआय लाईफ इन्शुरन्स – लक्ष्य किंमत: ₹२५७०
विमा क्षेत्रात एसबीआय लाईफने सातत्याने दमदार कामगिरी केली आहे. ३QFY26 मध्ये एजीपी मध्ये २४% वाढ नोंदवण्यात आली आहे. जीएसटीच्या प्रभावानंतरही कंपनीने आपला नफा टिकवून ठेवला आहे. येत्या काळात संरक्षणात्मक आणि अॅन्युइटी उत्पादनांना चांगली मागणी राहील, ज्यामुळे कंपनीचा परतावा १८% च्या वर राहण्याची शक्यता आहे.
वाचा - कोर्टाच्या निर्णयाला ट्रम्प यांच्याकडून केराची टोपली? अमेरिकन शेअर बाजार कोसळला; भारतात काय होणार?
५. अंबर एंटरप्रायझेस – लक्ष्य किंमत: ₹८७००
केवळ एअर कंडिशनिंगपुरते मर्यादित न राहता अंबरने आता इलेक्ट्रॉनिक्स आणि रेल्वे क्षेत्रातही मोठी झेप घेतली आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात ३८% ची वाढ होऊन तो २९.४ अब्ज रुपयांवर पोहोचला आहे. रेल्वे क्षेत्राकडून कंपनीला २६ अब्ज रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. २०२५ ते २०२८ दरम्यान कंपनीचा नफा ४३% चक्रवाढ दराने वाढण्याचा अंदाज असून, मार्जिनमध्येही सुधारणा अपेक्षित आहे.
वाचा - कोर्टाच्या निर्णयाला ट्रम्प यांच्याकडून केराची टोपली? अमेरिकन शेअर बाजार कोसळला; भारतात काय होणार?
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
